शिवा काशिद पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठांचा सन्मान

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Maharashtra Nabhik Mahamandal महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा दक्षिण विभागाच्या वतीने वीररत्न शिवा काशिद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथीनिमित्त उदयनगर येथील हनुमान मंदिरात अभिवादन करण्यात आले. यावेळी दक्षिण विभागातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 

vijay 
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फुलबांधे होते. प्रदेश कार्याध्यक्ष श्याम आस्करकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, प्रदेश सचिव राजू चिंचाळकर, समाजसेवक सुनील मानेकर, वैभव तुरक, तुषार मिराशे, मंजुषा पानबुडे, मालती अमृतकर आदी प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात वीररत्न शिवा काशिद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन प्रदीप सुर्वे यांनी, प्रास्ताविक भावना ईलोरकर यांनी, तर आभार रुपाली चौधरी यांनी मानले.
सौजन्य:विजय ईलोरकर,संपर्क मित्र