चंद्रपूर
suicide चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलेल्या एका व्यक्तीने पोलिसांवर गंभीर आरोप करीत विष प्राशन केले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दिलीप यादव (रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपूर) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
suicide 15 जुलै रोजी शहरातील भिवापूर वॉर्ड परिसरातील पांडुरंग बानलवार याच्या घरावर शहर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 1 किेलो गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी बानलवार याने आपण हा गांजा दिलीप यादव याच्याकडून आणला होता, अशी कबुली दिली. त्यामुळे शहर पोलिसांनी दिलीप यादव याला तपासासाठी आणि चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. यावेळी दिलीप यादव याने विष प्राशन केले असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दिलीप यादव याने आत्महत्येपूर्वी एक चित्रफीत तयार केली होती. या चित्रफीतीत त्याने माझी कुठलीही चूक नसताना मला शहर पोलिस ठाण्यातील काही कर्मचार्यांनी त्रास दिल्याचे म्हटले.
suicide या घटनेनंतर मृत दिलीप यादव याच्या कुटुंबियांनी पोलिसांवर अत्यंत गभीर आरोप केले आहे. पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली होती. पोलिसांच्या सततच्या त्रासाला कंटाळून दिलीप यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
चित्रफीतीमध्ये केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करू : नोपाणी
suicide मृतक दिलीप यादव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गांजा विक्रीसह तब्बल 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो आधीच विष प्राशन करून पोलिस ठाण्यात आला होता. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. त्या आधारावर आम्ही तपास करू. मृतकाने मृत्यूपूर्व चित्रफीतीमध्ये केलेल्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, तपासात कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष्य नोपाणी यांनी म्हटले.