पांढरकवडा,
pandharkawada police वाहतूक नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था राखताना 24 तास कार्यरत राहणाèया पोलिस प्रशासनाला बळ देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा संस्थेने सीएसआर निधीतून सुरक्षा साहित्याचे वाटप केले. राष्ट्रीय महामार्ग 44 वरील पांढरकवडा पोलिस ठाण्यात नुकताच एका विशेष उपक्रमात आधुनिक कार्यालयीन साहित्य व सुरक्षा उपकरणांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा संस्थेचे प्रकल्प संचालक प्रवीण बिजेवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमात पोलिस कर्मचाèयांना दर्जेदार सुरक्षा हेल्मेट प्रदान करण्यात आले. याशिवाय पोलिस ठाण्यातील अंतर्गत पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी कार्यालयीन साहित्य, शुद्ध व थंड पाण्यासाठी अत्याधुनिक वॉटर कूलर भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान प्रकल्प संचालक प्रवीण बिजेवार यांनी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व रस्ते सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी पांढरकवडा येथील मुख्य ‘वाय पॉईंट’वर लवकरच एका भव्य उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
यावेळी पांढरकवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एलडी तवारे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप नरसाळे, केळापूर टोल प्लाझाचे प्रमुख नीरज रामयानी यांच्यासह संस्थेचे प्रतिनिधी रंजन सिंग, पंकज हिंगे, भानूप्रताप सिंग व वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.
या मदतीबद्दल एलडी तवारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन सहायक पोलिस निरीक्षक सागर पेंडारकर यांनी केले.