हरवलेली दुचाकी अखेर सापडली

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Pratap Nagar Nagpur प्रतापनगर येथील रहिवासी व सिद्धार्थ प्रभात शाखा, जनता लेआऊट-दीनदयाल नगर शाखेचे स्वयंसेवक यशवंत शेंडे यांची दुचाकी (क्र. एमएच ३१ एफएच २१५२) ८ जानेवारी २०२६ रोजी घरासमोरून चोरीला गेली होती. सुमारे साडेपाच महिन्यांनंतर २५ जून रोजी त्रिमूर्तीनगर येथील गजानन महाराज मंदिराजवळ त्यांना ही दुचाकी चांगल्या स्थितीत उभी असल्याचे आढळले.
 
 
shankar
 
यानंतर त्यांनी वाहन प्रतापनगर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी आवश्यक शहानिशा व तपासणी पूर्ण करून वाहन तात्काळ त्यांच्या ताब्यात दिले. या तत्पर कामगिरीबद्दल प्रतापनगर पोलिसांचे कौतुक होत असून, यशवंत शेंडे यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
सौजन्य:शंकर पहाडे, संपर्क मित्र