चेन्नईहून मदुराईला जाणाऱ्या खाजगी स्लीपर कोच बसला आग

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
पेरांबळूर,
bus fire तामिळनाडूच्या पेरांबळूर येथे आज सकाळी चेन्नईहून मदुराईला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर कोच बसला आग लागली. बसमधील सर्व २३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
 

खाजगी स्लीपर कोच बसला आग 
 
 
 तामिळनाडूच्या पेरांबळूर येथे एक अपघात घडला. पेरांबळूर जिल्ह्यातील मंगलमेडूजवळ चेन्नई-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ५:३० च्या सुमारास चेन्नईहून मदुराईला जाणाऱ्या एका खाजगी स्लीपर कोच बसला आग लागली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बसमध्ये २३ प्रवासी होते. चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. आगीमुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली.bus fire अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे.