नागपूर,
Ramkrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.Ramkrishna Wagh College प्रा. दीपक ठाकरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांचे साहित्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शुभांगी वाघ यांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, प्रा. किरण पांडे, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
सौजन्य:सायली लाखे,पिदळी ,संपर्क मित्र