२० वर्षांपासून तिड्डी–मानेगाव रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत

लोकप्रतिनिधी कुंभकर्ण झोपेत

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
भंडारा
road-awaits bhandara तालुक्यातील मौजा तिड्डी–मानेगाव हा महत्त्वाचा संपर्क मार्ग गेल्या २० ते २२ वर्षांपासून दुरुस्तीअभावी अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
 
bhandara
 
road-awaits bhandara तिड्डी–मानेगाव बाजार हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 20 वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. त्यानंतर या रस्त्याची कोणतीही मोठी दुरुस्ती किंवा नूतनीकरण झाले नसल्याने संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
road-awaits bhandara यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे तो वाहून गेल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
road-awaits bhandara लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे याकडे लक्ष नसून कुंभकर्ण झोपेत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहे.या समस्येबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत तसेच रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.