कारंजा येथील श्रीजीत भोकरेचे अनेक राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमध्ये यश

*आयआयएससीमध्ये शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
कारंजा (घा.),
shrijit bhokre श्रीजीत राजश्री अजय भोकरे याने यावर्षी विविध राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय, अभियांत्रिकी, गणित आणि विज्ञान संशोधन अशा विविध क्षेत्रांतील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. देशातील प्रतिष्ठेच्या निट (युजी) परीक्षेत श्रीजीतने ७२० पैकी ६५५ गुण, ९९.६४ पर्सेंटाइल आणि ऑल इंडिया रँक ३१४७ प्राप्त केला आहे.
 

shrijit bhokre 
 
 
एमएचटी-सीईटी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात ९८.७३ पर्सेंटाइल, तर दुसर्‍या प्रयत्नात ९९.६३ पर्सेंटाइल मिळवत त्याने अभियांत्रिकी क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध केली. एमएचटी-सीईटीमध्ये ९६ पर्सेंटाइल मिळविले. गणित विषयातील देशातील अग्रगण्य संस्था आयएसआय कोलकाता येथील प्रवेश परीक्षेत २०० पैकी १५५ गुण मिळवत ऑल इंडिया रँक २०२ प्राप्त केला. तसेच आयआयएसइआर प्रवेश परीक्षेत ऑल इंडिया रँक ६३२९ मिळवून विज्ञान संशोधन क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. याशिवाय बी प्लॅनिंग परीक्षेत ९८.४६ पर्सेंटाइल मिळवून आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले.
 
विशेष म्हणजे श्रीजीतने घरून नियमित स्वयंअभ्यास केला. त्याने विज्ञान संशोधनाशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी केली. डिजिटल शिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट यश मिळविता येते, हे त्याने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखविले आहे.
 
श्रीजीतचे नर्सरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गुरुकुल पब्लिक स्कूल कारंजा (घा.) येथे तर अकरावी-बारावीचे शिक्षण मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय कारंजा (घा.) येथे झाले.shrijit bhokre त्याने आपल्या यशाचे श्रेय गुरुकुल पब्लिक स्कूल, मॉडेल कनिष्ठ महाविद्यालयातील मार्गदर्शक शिक्षक आणि विशेषतः आपल्या आईला दिले आहे.
भविष्यात बंगलोर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे उच्च शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्याचे ध्येय असल्याचे श्रीजीतने सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे यश प्रेरणादायी ठरत असून, चिकाटी, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, हा विश्वास त्याने आपल्या यशातून दृढ केला आहे.