दोन ठिकाणच्या बैल चोरणाऱ्यांचा पर्दाफाश; 6 आरोपी गजाआड

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
10 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त
पांढरकवडा,
theft of bullocks from two locations शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाèया एका सक्रिय टोळीचा पांढरकवडा पोलिसांनी अत्यंत शिताफीने छडा लावला आहे. तालुक्यातील दोन वेगवेगळ्या शेत शिवारांमधून गोठ्यात बांधलेले बैल चोरणाèया 6 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी व दुचाकी वाहने, मोबाईल फोन व रोख रकमेसह एकूण 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
 
 
theft of bullocks from two locations
 
वेगवेगळ्या दोन शेत शिवारातून बैलांची चोरी झाली होती. बैल चोरीच्या या दोन्ही घटना जून 2026 च्या पहिल्या आठवड्यात घडल्या होत्या. या प्रकरणी 7 जून रोजी अयुबखान यासिनखान मनिषार तर 9 जून रोजी स्वप्नील अण्णा ठाकरे यांनी बैल चारीची तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या चोरीच्या घटनांमुळे पोलीस निरीक्षक एलडी तावरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले.
 
 
ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात धृप अतुल तूमके (वय 21 वर्ष), रा. डॉ. आंबेडकर वार्ड, पांढरकवडा, सैयद अकीब सैयद अकबर खान (वय 26 वर्ष), रा. मौलाना आझाद वार्ड, पांढरकवडा व शाहरुख खान अयुब खान (वय 33 वर्ष), रा. चंद्रशेखर वार्ड, पांढरकवडा या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन क्र. एमएच29 बीई1472 जप्त करण्यात आले.
 
 
दुसèया गुन्ह्यात अभिषेक विजय मडावी (वय 20 वर्ष), रा. बेघर वार्ड क्र. 7, पांढरकवडा, राकेश देवीदास चौधरी (वय 25 वर्ष), रा. आखाडा वार्ड, पांढरकवडा व अभय उर्फ दुर्लभ जयपाल मेश्राम (वय 26 वर्ष), रा. म. ज्योतीबा फुले वार्ड, पांढरकवडा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 4 लाख रुपयांचे वाहन, 45 हजार रुपयांची एक दुचाकी व 1 लाख 10 हजार रुपये किमतीचे 5 मोबाईल जप्त करण्यात आले.
 
 
तसेच, चोरांनी विकलेल्या बैलांच्या किमतीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात हस्तगत केली आहे. ही धडक कारवाई पांढरकवडा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक रोबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार एलडी तावरे, पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर, विलास जाधव, रजनीकांत पाटील, सुनील राठोड, सचिन काकडे व राजू मुत्तलवार यांनी पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पेंढारकर, सुनील कुंटावार, संदीप मडावी, जया रोगे व अविनाश रिंगणे करत आहेत.