पोलिसांना मोठे यश..दोन कुख्यात गँगस्टर अटकेत

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
पंजाब
wanted gangsters पंजाब आणि हरियाणा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दोन्ही राज्यांतील दोन फरार आणि वॉन्टेड गँगस्टरना आफ्रिकेतील अंगोला येथे अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या कारवाईत पंजाब आणि हरियाणा पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 

two wanted gangsters arrested in angola in joint operation by punjab and haryana police 
परदेशात लपून बसलेल्या गुन्हेगारांविरोधातील कारवाईचा वेग वाढवण्यात आला असून, त्याच मोहिमेचा भाग म्हणून या दोन्ही गँगस्टरचा शोध घेण्यात आला होता. पोलिसांनी संबंधित देशांतील यंत्रणांशी समन्वय साधत त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परदेशातून गुन्हेगारी कारवाया चालवणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अनेक आरोपींनी कारवाई टाळण्यासाठी परदेशात आश्रय घेतल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. अशा फरार आरोपींविरोधात इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस जारी करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, दोन्ही आरोपींना भारतात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. परदेशात बसून गुन्हेगारी नेटवर्क चालवणाऱ्यांविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला यामुळे आणखी बळ मिळणार आहे.