माहूर नपंच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्या कदम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
माहूर,
mahur municipal council माहूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी माहूर नगरपंचायतच्या तत्कालीन मुख्याधिकारी विद्या पंडित कदम यांनी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायाधीश बालाजी उमाजी चौधरी यांनी 16 जुलै रोजी फेटाळला.
 
 
 
दक्षता व सुरक्षा विभाग म्हाडा मुंबईचे सहायक पोलिस निरीक्षक महेश विष्णू चव्हाण यांनी 24 जून रोजी माहूर पोलिस ठाण्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीत गुन्ह्याची घटना 7 सप्टेंबर 2018 च्या कालावधीत घडल्याचे म्हटले आहे. 2 कोटी, 7 लाख, 1 हजार 724 एवढी रक्कम लाभार्थ्यांना देय असताना हा निधी लाभार्थ्याव्यतिरिक्त अपहार करून इतर खात्यावर अनियमितपणे वर्ग झाला आहे.
 
 
या प्रकरणी शासनाच्या निधीचा अपहार व शासनाची फसवणूक झाल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी माहूर नगरपंचायत माहूर व इतर संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्याधिकारी विद्या पंडित कदम यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने 16 जुलै रोजी नाकारला.