2027 विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला संघातून वगळणार?

बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
मुंबई,
rohit sharma 2027 च्या विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला भारतीय एकदिवसीय संघातून वगळले जाऊ शकते, अशा चर्चांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकाèांनी फेटाळून लावले आहे. या अनुभवी सलामीवीराच्या भवितव्याबाबत वाढत्या तर्कवितर्कांच्या पृष्ठभूमीवर, वरिष्ठ क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांनी मंडळाच्या अनेक अधिकाèयांशी केलेल्या चर्चेनंतर हा खुलासा करण्यात आला आहे.
 
rohit sharma
 
असे वृत्त होते की, आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय निवडकर्ते रोहित शर्माला संघातून वगळून वरच्या फळीत युवा फलंदाजांचा समावेश करण्याचा विचार करत होते. मात्र, कुमार यांच्या मते, बीसीसीआयच्या अधिकाèयांनी असा कोणताही निर्णय घेतल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. अनेक वरिष्ठ अधिकाèयांशी चर्चा केल्यानंतर कुमार यांनी सांगितले की, रोहितला भारताच्या एकदिवसीय संघातून लवकरच वगळले जाणार असल्याच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.
 
ते म्हणाले, की, ‘रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत मी बीसीसीआयच्या अनेक अधिकाèयांशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, या केवळ प्रसारमाध्यमांनी पसरवलेल्या अफवा आहेत. रोहित शर्मा 2027 चा विश्वचषक खेळणार आहे.‘ रोहितचे एकदिवसीय संघातील स्थान धोक्यात असल्याबाबत सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या काही वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असतानाच त्यांची ही प्रतिक्रिया आली आहे.