जिप कर्मचारी पतसंस्थेने दाखवला बोगस नफा

सभासद आसाराम चव्हाण : अनावश्यक भरती कशासाठी ?

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
यवतमाळ,
zilla parishad employees जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थाही पगारदार पतसंस्था असून, सुद्धा संचालक मंडळाच्या मनमानी व चुकीच्या कारभारामुळे एनपीए 42 कोटी म्हणजेच 18 टक्के झाला. असे असताना एनपीएची योग्य प्रमाणात तरतूद न करता बोगस नफा दाखवून सभासदांची दिशाभूल करुन पतसंस्था डबघाईस आणत असल्याचा आरोप संस्थेचे सभासद आसाराम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
 
 
zilla parishad employees
 
यावेळी गजानन मडावी, सचिन गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना आसाराम चव्हाण म्हणाले, पतसंस्था चार वर्षापूर्वी राज्यात प्रथम क्रमांकाची पतसंस्था होती. चार वर्षापूर्वी परिवर्तन होऊन आलेल्या संचालक मंडळाने अनेक वादग्रस्त निर्णय घेऊन व प्रचंड भ्रष्टाचार केल्याने ही पतसंस्था सध्या डबघाईस आली आहे. ठेवीचा आकडा फुगवून दाखवण्यासाठी या संचालक मंडळाने एका पतसंस्थेमध्ये 111 कोटी गुंतवले असून त्या संस्थेकडून 70 कोटीच्या ठेवी घेतल्या आहेत. एनपीएमध्ये असणाèया सभासदांचे व्याज नियमाप्रमाणे उत्पन्नात घेता येत नाही. परंतु संचालक मंडळाने अनेक थकीत सभासदांच्या व्याजाची रक्कम एनपीएमध्ये घेऊन चुकचा नफा दाखविला आहे.
 
 
तसेच पतसंस्थेत विनाकारण नोकर भरती केली असून, यापुढे सुद्धा 10 कर्मचाèयांची भरती करण्यासाठी संचालक मंडळाचा आटापीटा सुरु आहे. गृह कर्ज केवळ 2 कोटीच असून नियमित कर्ज 235 कोटी आहेत. अशी फसवी घोषणा न करता वाढविलेले व्याजदर 9 टक्के करुन नियमित कर्जदारांना लाभ द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. संस्थ्या अनावश्यक नोकर भरती बाबत लवकरच आंदोलन करुन संस्थेतील भ्रष्टाचार समोर आणू असा इशारा यावेळी देण्यात आला.
पतसंस्थेवर बिनबुडाचे आरोप
पतसंस्थेवर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहे. संस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असला तरी संस्था अशा आरोपांना उत्तर देताना केवळ तथ्य, नियम आणि पारदर्शक कारभार यावर विश्वास ठेवते. सभासदांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेऊ नये.
-महेश सोनेकर
अध्यक्ष जिल्हा परिषद पतसंस्था