अमरावतीचा ४.४६ कोटींचा गांजा नष्ट

अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
अमरावती,
amravatis cannabis stock destroyed अमरावती ग्रामीण पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन कवच दरम्यान जप्त करण्यात आलेला ४ कोटी ४८ लाख ८० हजाराचा गांजा नागपुर जवळील बुटीबोरी येथे नष्ट करण्यात आला.अमली पदार्थाच्या अवैध उत्पादन वाहतूक, साठवण, विक्री व सेवनाला आळा घालण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विशेष अभियाना अंतर्गत सदर गांजा जप्त करण्यात आला होता. सदर ऑपरेशन दरम्यान समाजात अमली पदार्थ विरोधात जनजागृती निर्माण व्हावी, समाज अमली पदार्थ आहारी जावू नये याकरीता विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
 
 
tiroda municipal council
 
पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात केलेल्या कार्यवाही मध्ये जप्त केलेला मुद्देमाल सुध्दा नाश करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. सदर मुद्देमाल नाश करण्याची परवानगी ही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मुंबई यांचेकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लि. कंपनी, एमआयडीसी बुटीबोरी नागपूर येथे सदरचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात विविध पोलिस स्टेशन मध्ये जप्त असलेला एकूण ४७ गुन्हयातील मुद्देमाल ज्याचे वजन एकूण १४८६ कि.ग्रॅ. तसेच कि.अं. ४ कोटी ४५ लाख ८० हजार होती, तो नाश करण्यात आला. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक किरण वानखडे, पोलिस निरीक्षक अशोक लांडे, पोउपनि सागर हटवार व अंमलदार यांनी केली.