नागपूर,
Ashadhi Ekadashi श्री हनुमान मंदिर, श्रद्धानंद पेठ व चिन्मय मिशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त २० ते २४ जुलै दरम्यान दररोज सायंकाळी ७.१५ वाजता श्री हनुमान मंदिरात 'ज्ञानयज्ञ : पसायदान – वैश्विक दृष्टीसाठी विश्वप्रार्थना, ही काळाची गरज' या विषयावर ब्रह्मचारी सुचेत चैतन्य यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रवचनमालेत पसायदानाचे तत्त्वज्ञान, विश्वकल्याणाची भावना आणि आजच्या काळातील त्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र