अस्मिता ठरली राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेची उपविजेती

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
asmita-dambhare : स्केटिंगमध्ये नावलौकिक करणाèया अस्मिताने पुणे येथे झालेल्या 13 व्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावत रजतपदक पटकावले. संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या हजारो स्पर्धकांतून तिने हे यश संपादन केले. मागील 6 महिन्याच्या कालावधीत स्केटिंगच्या विविध स्पर्धेत तिने आतापर्यंत 8 सुवर्ण, 5 रजत व 12 कांस्यपदके पटकावली.
 

y19July-Asmita 
 
 
 
अस्मिताच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल संताजी ग्रुप यवतमाळच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर रायमल, विलास काळे व इतर समाजातील प्रतिष्ठीत उपस्थित होते. सोबतच तिचे वडील अमित डंभारे, आई अश्विनी डंभारे व प्रा. सुनील डंभारे उपस्थित होते.