धोंडी धोंडी पाणी दे गावकर्‍यांचे वरुणराजाला विठ्ठल मंदीरात साकडे

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
buldhana news गेल्या दहा दिवसांपासून तालुयातील बहुतांशी भागांत पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी बहुतेक शेतकर्‍यांच्या पेरण्या अजूनही झालेल्या नाहीत, तर ज्यांनी आधी पेरणी केली होती, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. देऊळघाट गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी एकत्र येत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विठ्ठल रुमिणी मंदिराच्या पहिल्या पायरीला साकडे घातले.
 
 
buldhana news
 
पावसाचे तात्काळ आगमन व्हावे यासाठी देऊळघाट बसस्थानक परिसरातील विठ्ठल रुमिणी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून मूर्तीला व पहिल्या पायरीला अभिषेक घालण्यात आला. विठ्ठला, लवकर पाऊस पाड आणि बळीराजाला या संकटातून वाचव, अशी आर्त साद यावेळी महिलांनी आणि ग्रामस्थांनी घातली.
 
 
पाऊस पडावा यासाठी गावात पारंपरिक पद्धतीने ’पाणदेव’ काढण्यात आला. डफड्याच्या तालावर आणि ’धोंडी धोंडी पाणी दे, साथमाय पाणी दे’ अशा पारंपरिक गाण्याच्या सुरांवर महिला व ग्रामस्थांनी ठेका धरत नृत्य केले. गावातून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. पाऊस पाडण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पाणदेव काढून वरुणराजाला साकडे घातल्यास पाऊस नक्की येतो अशी गावकर्‍यांची गाढ श्रद्धा असल्याने हा उपक्रम राबवण्यात आला. मागील महिन्यापासून काही शेतकर्‍यांनी कशाबशा पेरण्या उरकल्या होत्या, मात्र गेल्या १० दिवसांपासून कडक ऊन आणि पावसाच्या खंडाने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे या शेतकर्‍यांवर आता दुबार पेरणीची वेळ आली आहे.
 
 
दुसरीकडे जमिनीतील ओलावा संपल्याने उर्वरित बहुतांश शेतकर्‍यांच्या पेरण्या पूर्णपणे रखडल्या आहेत. शेतीची कामे ठप्प झाल्याने मजुरांच्या हातालाही काम मिळेनासे झाले आहे. सध्या संपूर्ण तालुयात चिंतेचे वातावरण असून जर आगामी मागील महिन्यापासून काही शेतकर्‍यांनी पेरणी केलेली असून, पावसाने दडी मारल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर बहुतेक शेतकर्‍यांच्या पेरण्या अजूनदेखील झाल्या नाहीत. शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. म्हणूनच आम्ही देऊळघाट गावातील ग्रामस्थ व महिलांनी पाऊस मागण्यासाठी पांडुरंगाला साकडे घातले आहे आणि पारंपरिक मिरवणूक काढली आहे.