चाकोली येथे चोरी ;६५ हजार रुपयाचा ऐवज लंपास

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
रिसोड
Chakoli House Theft तालुयातील चाकोली येथे अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १८ जुलै रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध रिसोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Chakoli House Theft : Gold Jewellery and Cash Worth ₹65,000 Stolen in Risod 
मिळालेल्या माहितीनुसार, विकास सानप यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते वाशीम येथील दत्तनगर लाखाडा येथे नोकरी निमित्त राहत असून, चाकोली येथील घराला कुलूप लावून ते वाशीमला असताना १७ जुलै मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरांनी त्यांच्या घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट तोडून त्यातील सोन्याची एकदाणी किंमत ४० हजार रुपये व नगदी रोख रक्कम २५ हजार रुपये असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.