तभा वृत्तसेवा
वणी,
blood-donation-camp : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वणी शहरतर्फे बुधवार, 22 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वरोरा मार्गावरील बाजोरिया हॉलमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेदरम्यान हे शिबिर होत असून 200 रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी निश्चित केले आहे.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्ताचा तुटवडा दूर व्हावा आणि रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळावे, या सामाजिक उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.
हे रक्तदान शिबिर वणी शहर भाजपा शहराध्यक्ष अॅड. नीलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात आयोजित केले आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आलेे. यासाठी संयोजक : बालाजी भेदोडकर (9738341616, सहसंयोजक विलास डवरे (9404526769), सहसंयोजक वैशाली वातिले (9421851725), भारती बदखल (8329116705) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.