बाल हक्क संरक्षण आयोगाकडून रोठा येथील घटनेची दखल

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
वर्धा,
child rights रोठा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणाची राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्य गितांजली बुटी व प्रवीण भुजाडे यांनी वर्धेत पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडून घटनेबाबत माहिती जाणून घेत त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.
 

v 
 
१२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार १५ रोजी रोठा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणातील आरोपी राहुल मडावी (३०) रा. रोठा याला अटक करून त्याची पोलिस कोठडी मिळवली आहे. या घटनेची दखल घेत १७ रोजी राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी पोलिस अधीक्षकांकडून माहिती जाणून घेत पीडित कुटुंबाला न्यायिक हक्क मिळवून देण्यासाठी चर्चा झाली. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण, मुस्ताक पठाण यांची उपस्थिती होती. ती घटना अत्यंत गंभीर असून आरोपीवर तात्काळ कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी. प्रकरणातील आरोपीविरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच घटना अहवाल व शवविच्छेदन अहवाल प्राप्त करुन तो महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगास सादर करण्याच्या सूचना यावेळी बुटी, भुजाडे यांनी दिल्या.
मुलांना ‘गुड टच बॅड टच’ विषयी जागृत करा
जिल्ह्यामध्ये बाल स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये चांगला स्पर्श व वाईट स्पर्श विषयावर नियमित जनजागृती कार्यक्रम राबवावे. तसेच घरातील व्यक्ती घरी नसल्यास आणि त्यावेळी कोणताही व्यक्ती आल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेणेबाबत प्रशिक्षण विद्याथ्र्यांना देण्यात यावे. १६ ते १८ वर्षे वयोगटातील अल्पवयीन तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यात यावे. गाव बाल संरक्षण समितीची दरमहा नियमित बैठकी घ्याव्या, अशाही सूचना यावेळी आयोगाच्या सदस्यांनी दिल्या.
...चौकट पूर्ण...