धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर धम्माल

नवव्या दिवशी कमाईत मोठी वाढ, भारतात 111 कोटींचा टप्पा पार

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मुंबई
dhamaal 4 अजय देवगण अभिनित मल्टिस्टारर कॉमेडी चित्रपट ‘धमाल 4’ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी, शनिवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. कोणताही मोठा गाजावाजा किंवा कोट्यवधी रुपयांच्या प्रमोशनशिवाय प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.
 

dhamaal 4 box office collection crosses 111 crore in india within 9 days starring ajay devgn 
‘धमाल 4’ हा चित्रपट १० जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई करत सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत मोठी वाढ झाली असून चित्रपटाने २२.५० कोटी रुपये कमावले. तिसऱ्या दिवशी २८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवत चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली.सॅकनिल्कच्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ‘धमाल 4’ने ५.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर शनिवारी, नवव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ झाली. या दिवशी चित्रपटाने भारतात १० कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत ‘धमाल 4’ने भारतातdhamaal 4  एकूण 111.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 151 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. चित्रपटाने परदेशी बाजारपेठेत 18.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट अंदाजे 130 ते 200 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.‘धमाल 4’ हा लोकप्रिय ‘धमाल’ फ्रँचायझीचा चौथा भाग आहे. या मालिकेतील पहिला चित्रपट ‘धमाल’ 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2011 मध्ये ‘डबल धमाल’ आणि 2019 मध्ये ‘टोटल धमाल’ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता चौथ्या भागात अजय देवगण यांच्यासह अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, रवी किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, अंजली आनंद, संजीदा शेख आणि ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.दरम्यान, ‘धमाल 4’समोर आता हॉलिवूड चित्रपट ‘द ओडेसी’चे आव्हान आहे. हा चित्रपट १७ जुलै रोजी भारतात प्रदर्शित झाला असून त्याने आतापर्यंत १७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आगामी दिवसांत बॉक्स ऑफिसवर ‘धमाल 4’ आणि ‘द ओडेसी’ यांच्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.