दीपिका कक्कडची चिंता वाढली

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मुंबई
dipika kakar   टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कड यांनी त्यांच्या ताज्या व्लॉगमधून आईच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सतत होत असलेल्या असह्य पोटदुखीमुळे त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, चाहत्यांनी काळजी करू नये, अशी खात्रीही दीपिका यांनी दिली असून सध्या त्यांच्या आईच्या त्रासाचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 

dipika kakar mother hospitalized due to severe stomach pain actress shares health update 
दीपिका यांनी रुग्णालयातील वॉर्डमधून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांची आई हॉस्पिटलच्या बेडवर विश्रांती घेताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, “मी सध्या रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये आहे, कारण यावेळी माझ्या आईला दाखल करण्यात आले आहे. आम्ही त्यांना काल दुपारी येथे आणले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पोटात दुखत होते.”दीपिका यांनी सांगितले की, सुरुवातीला कुटुंबीयांना हा प्रकार फूड इन्फेक्शनमुळे झाला असावा असे वाटले होते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्यांच्या आईवर अँटिबायोटिक्स सुरू करण्यात आले आणि सोनोग्राफीसह काही तपासण्या करण्यात आल्या. मात्र, या तपासण्यांमधून कोणतेही ठोस कारण समोर आले नाही. औषधे सुरू करूनही पोटदुखी कमी झाली नाही.
त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या आईची औषधे बदलली. त्यामुळे काही काळ त्यांना आराम मिळाला. मात्र, जवळपास दोन दिवसांनी पुन्हा वेदना सुरू dipika kakar  झाल्या आणि त्यांना उलट्यांचाही त्रास झाला. त्यानंतर डॉक्टरांनी आणखी वेळ न दवडता तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.आईच्या वेदनांबाबत चिंता व्यक्त करताना दीपिका म्हणाल्या की, “आता किमान त्यांना वेदना होत नाहीत. त्यांना खूप त्रास होत होता आणि आमच्यासाठी हीच सर्वात कठीण गोष्ट होती. त्या सर्व औषधे घेत होत्या, पण तरीही वेदना कमी होत नव्हत्या.”दीपिका यांनी सांगितले की, त्यांच्या आईला १३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सीटी स्कॅन आणि इतर अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असून, पोटदुखीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, दीपिका कक्कड यांच्या कुटुंबासाठी हे वर्ष अनेक चढ-उतारांचे ठरले आहे. यापूर्वी त्यांच्या सासऱ्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबीयांसाठी हा काळ भावनिक आणि आव्हानात्मक ठरत आहे.