एमबापेचा महाविक्रम; मेस्सीला टाकले मागे!

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली:
mbapp-overtakes-messi : फुटबॉल महाकुंभ २०२६ मधील 'सोनेरी बूट' (गोल्डन बूट) जिंकण्याची शर्यत आता अत्यंत उत्कंठावर्धक झाली आहे. फ्रान्सचा धडाकेबाज फुटबॉलपटू किलियन एमबापे याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात दोन शानदार गोल करत या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले आहे. यासोबतच एमबापे आता फुटबॉल महाकुंभाच्या संपूर्ण इतिहासात सर्वाधिक गोल करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.
 
 

mbapp-overtakes-messi 
 
 
मेसीला टाकले मागे; एमबापेच्या नावावर २२ गोल
 
 
किलियन एमबापेने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील दोन गोलांच्या जोरावर इतिहास रचला आहे. तो आता या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. एमबापेने आतापर्यंत खेळलेल्या केवळ तीन महाकुंभ स्पर्धांमध्ये एकूण २२ गोल केले आहेत. या बाबतीत त्याने अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेसी याला मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर २१ गोल आहेत.
 
सोनेरी बूट जिंकण्यासाठी मेसीसमोर मोठे आव्हान
 
 
या स्पर्धेत एमबापेने आतापर्यंत १० गोल आणि ४ गोल करण्यास मदत (असिस्ट) केली आहे, ज्यामुळे तो पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लिओनेल मेसी ८ गोल आणि ४ गोल करण्यास मदत करून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात सर्वांचे लक्ष मेसीवर असेल. मेसीला आपल्या कारकिर्दीत अद्याप एकदाही 'सोनेरी बूट' पुरस्कार मिळवता आलेला नाही, त्यामुळे एमबापेला मागे टाकून हा पुरस्कार जिंकण्यासाठी त्याला अंतिम सामन्यात मोठी कामगिरी करावी लागेल.
 
या यादीत इंग्लंडचा ज्युड बेलिंगहॅम आणि नॉर्वेचा अर्लिंग हालंड ७-७ गोलांसह तिसऱ्या स्थानावर आहेत, परंतु त्यांच्या संघांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
 
चालू स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारे प्रमुख खेळाडू:
 
 
१. किलियन एमबापे (फ्रान्स) - १० गोल, ४ मदत
२. लिओनेल मेसी (अर्जेंटिना) - ८ गोल, ४ मदत
३. ज्युड बेलिंगहॅम (इंग्लंड) - ७ गोल, १ मदत
४. अर्लिंग हालंड (नॉर्वे) - ७ गोल, ० मदत