नागपूर,
Green Nagpur Mission 2026 मा इरा हीलिंग्सच्या 'ग्रीन नागपूर मिशन २०२६ – एक पेड माँ के नाम' या उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ नागपूर मेट्रोपॉलिटन व एल.ए.डी. महाविद्यालयाच्या सहकार्याने महुरझरी येथे ४० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थिनी तसेच महुरझरी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी मा इरा हीलिंग्सच्या संस्थापक तथा लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा पियू लाहोरी, रश्मी भिडे, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्या सप्रे, रश्मी कोचे व प्राध्यापक उपस्थित होते. 'ग्रीन नागपूर मिशन २०२६' अंतर्गत नागपूर परिसरात १,००० देशी वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचा संकल्प असल्याचे पियू लाहोरी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली.
सौजन्य:पियू लाहोरी ,संपर्क मित्र