ढाका
hindu who erected a statue of shri ram बांग्लादेशमध्ये प्रभू श्रीरामाची ८१ फूट उंच पुतळा उभारण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका हिंदू व्यक्तीला पोलिसांनी मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटक केली. हरिदास चंद्र असे तरुणाचे नाव आहे. पोलिस कारवाईच्या विरोधात हिंदूंना संताप व्यक्त करत ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबबाहेर जोरदार निदर्शने केली. एका कटाचा भाग म्हणून हरिदास यांना अटक केल्याचा आरोप अल्पसंख्यक नागरिकांनी केला.

कारवाईचा निषेध करण्यासाठी अल्पसंख्याक समुदायांनी (हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन) शनिवारी ढाका येथे पोलिस आणि रहमान सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. बांग्लादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेचे सरचिटणीस मनिंद्र कुमार नाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हरिदास चंद्र गायकबांधा जिल्ह्यातील पलाशबारी परिसरात प्रभू रामाचा पुतळा उभारत होते. बांगलादेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ९.३५ कोटी टाका (बांग्लादेशी चलन) रकमेच्या संशयास्पद व्यवहार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली हरिदासला अटक केली. श्रीरामाच्या पुतळ्याच्या कामात अडथळा आणण्यासाठी सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी कारवाई केली. हरिदास यांच्या सुटकेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
देशव्यापी आंदोलन उभारणार
बांग्लादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ऐक्य परिषदेच्या नेतृत्वाखालील राजधानी ढाका येथे हिंदू समुदायाचे आंदोलन सुरू आहे. परिषदेचे सरचिटणीस मनिंद्र कुमार नाथ यांनी हरिदासच्या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि म्हटले की, निर्दोष हरिदासला तत्काळ सोडले नाही, तर हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदाय येत्या काही दिवसांत रस्त्यावर उतरून एकजूट आणि हिंसक आंदोलन करतील. सोमवारपासून देशव्यापी आंदोलनाचाही त्यांनी इशारा दिला आहे.
अल्पसंख्याकांवरील हल्ले सुरूच
मनिंद्र कुमार नाथ यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या जवळपास ३,००० घटनांची नोंद झाली असून, त्यात ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कट्टरवाद्यांनी अनेक मंदिरांनाही लक्ष्य केले आहे. अलीकडेच, नरसिंगदी येथील २५ वर्षीय हिंदू तरुण चंचल भौमिक याची हत्या करण्यात आली.