बेथेल ठरला भारताचा डोकेदुखी; इंग्लंड १०० पार

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
लॉर्ड्स,
ind-vs-eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये तीन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे या सामन्यात खेळत नाहीत. त्यांच्या जागी प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग आणि केएल राहुल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
BETHEL
 
 
मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे जो संघ आजचा सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. भारतीय संघाला आजचा सामना जिंकून इतिहास रचण्याची एक मोठी संधी आहे, कारण भारतीय संघाने गेल्या २२ वर्षांत लॉर्ड्सवर एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही.