ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
पुणे
kumar saptarshi ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ’युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट— गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन झाले, 85 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट—ातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. विधिमंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर समाजावादी विचारवंत, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
 

kumar saptarshi passes away at 85 veteran socialist leader and ykrand founder dies in pune 
कुमार सप्तर्षी यांचा मुलगा कबीर सप्तर्षी इंग्लंडहून आल्यानंतर सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोथरुडमधील गांधी भवन इथं ठेवलं जाईल, त्यानंतर अंत्यसंस्कार होतील, अशी देखील माहिती संबंधितांनी दिली. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी कुमार सप्तर्षी यांना सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहिली आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते, पुरोगामी विचारवंत, ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक आणि महाराष्ट— गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट—ातील एक प्रमुख पुरोगामी विचारवंत होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यात ते कायम अग्रेसर असत. आज समाज एका विचित्र परिस्थितीतून मार्गक्रमण करत असताना, द्वेष, हिंसा, आर्थिक विषमता यासारख्या प्रवृत्ती बळावत असताना ग्रामीण विकासाचा, मानवतेचा आणि गांधीवादाचा विचार घेऊन चालणारे डॉ. कुमार सप्तर्षी सरांसारखे व्यक्तिमत्व आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. त्यांच्या माध्यमातून गांधी विचारांचा एक सच्चा पाईक आपल्यातून निघून गेला, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, कुमार सप्तर्षी हे विद्यार्थी दशेपासूनच चळवळीशी जोडले गेले होते. आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात त्यांनी अनेक आंदोलने केली. तर, 9 ऑगस्ट 1977 रोजी चंद्रशेखरजी यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात कुमार सप्तर्षी यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर, जनता पक्षातर्फे 1978 साली ते अहमदनगरमधून आमदार बनले होते.