अयोध्या
saryu river in ayodhya वाराणसीतील गंगा घाटावरील पार्टीनंतर आता अयोध्येतील शरयू नदीत अशीच एक घटना समोर येत आहे. शरयू नदीत काही तरुण मटण पार्टी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. शरयू नदीतील या मटण पार्टीमुळे भाविकांच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे.

शरयू नदीतील बोटीवर झालेल्या मटण आणि बिअर पार्टी प्रकरणी कँटोन्मेंट पोलिसांनी लवकुश निषाद, राजकुमार निषाद आणि जितेंद्र निषाद यांना अटक केली आहे. एक आरोपी सध्या फरार आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. अयोध्या, रामनगरी येथे माता शरयूच्या प्रतिष्ठेचा भंग झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. भक्तांच्या श्रद्धेचा भंग करणारा हा व्हिडिओ वादग्रस्त ठरला आहे. शरयू नदीच्या अखंड प्रवाहात एका बोटीवर काही तरुण बिअर आणि मटण पार्टी करताना दिसत आहेत, जे कॅमेèयात कैदही झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मटण पार्टीचा व्हिडिओ, कट पोलिस स्टेशनजवळील गुप्तरघाट येथील असल्याचा दावा केला जात आहे. या घाटावर दररोज हजारो भाविक शरयू नदीच्या अखंड प्रवाहात स्नान करतात. निषाद समाजाचे चार तरुण बोटीवर बिअर आणि मटण पार्टी करत असल्याचा दावा केला जात आहे. हे चौघेही गुप्तरघाटचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.