हनुमान गढीवर सामूहिक हनुमान चालीसा पठन
अमरावती,
uddhav thackerays श्री हनुमान गढी येथे शनिवारी हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा आणि आ. रवि राणा यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण करून राज्यातील शेतकरी सुखी, समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत तसेच वरुणराजाची कृपा होऊन सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.नवनीत राणा यावेळी म्हणाल्या की, रामरक्षा पठन हा श्रद्धेचा विषय आहे; मात्र उद्धव ठाकरे हे रामरक्षा नव्हे तर पक्षरक्षा करण्याचे काम करत आहेत. जेव्हा ते स्वतः मुख्यमंत्री होते, तेव्हा मला आणि आमदार रवि राणा यांना हनुमान चालीसा पठन करण्यापासून रोखले.

आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून तब्बल १४ दिवस कारागृहात ठेवण्यात आले. हनुमान चालीसा म्हणण्यास विरोध केल्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यांचा पक्ष कमकुवत झाला. उद्धव ठाकरे यांनी कटप्पाप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आज तेच नागपूरमध्ये येऊन मुख्यमंत्री यांच्या घरासमोर रामरक्षा पठन करीत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या ऐतिहासिक सोहळ्यावेळी देशभरातील रामभक्त अयोध्येत उपस्थित होते. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते? त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले नाही. आता मात्र रामरक्षा पठनाचे नाटक करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका त्यांनी केली.
यावेळी आमदार रवि राणा म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये जाण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील मुख्यालयात जाऊन दर्शन घ्यावे. त्यानंतर वेळ काढून अमरावती येथील श्री हनुमान गढी येथे येऊन १५१ फूट उंच भव्य हनुमान मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि हनुमान चालीसा पठन करावे. आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू. श्री हनुमान गढी परिसर जय श्रीराम आणि जय बजरंगबलीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
यावेळी निलेशचंद्र मुनी महाराज - मुंबई, उपमहापौर सचिन भेंडे, सुनील राणा, कमलकिशोर मालाणी, नंदेश अंबाडकर, शैलेंद्र कस्तुरे, वायएसपीचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश साबळे, सोनाली नवले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे, सुनील खराटे, भाजपाचे रविराज देशमुख, ललीत समदुरकर, नगरसेविका राधा कुरील, मिलींद बांबल, संजय तिरथकर, कल्याणी तायडे, सुनिता लोणारे, वायएसपी गटनेते नाना आमले, शिक्षण सभापती प्रिती रेवणे, प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, नंदा सावदे, प्रियंका पाटने, अर्चना पांडे, योगेश विजकर, सुमती ढोके, मिरा कांबळे, अजय जयस्वाल, गौरी मेघवानी, रजनी डोंगरे, किशोर जाधव, संजय हिंगासपुरे, सुधा तिवारी, गंगा खारकर, राजू कुरील, विक्की शर्मा, आकाश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.