पंडित बच्छराज व्यास शाळेत गुणवंताचा सत्कार

(इंग्रजी माध्यम )

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Pandit Bachraj Vyas English Medium मेडिकल चौक राजाबाक्षा स्थित पंडित बच्छराज व्यास विद्यालय इंग्रजी माध्यम येथे गुणवंताचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.हा कार्यक्रम पूजनीय गोळवलकर गुरुजी हॉल मध्ये आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय शिक्षण मंडळाचे सचिव ॲड. उपेंद्र जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद राजकारणे तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर उपस्थित होते.सत्र 2025-26 मध्ये वर्ग 10 मधील गुणवंत विद्यार्थी तमन्ना गुप्ता, पुण्या भोसले, संस्कृती कुलारकर, अक्षित पुरोहित यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच वर्ग 6 ते 9 चे गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त विद्यार्थ्यांचा देखील या वेळी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
shala
 
 
 
प्रास्ताविक भाषणात मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.अधक्ष्यीय भाषणामध्ये ॲड उपेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन वैष्णवी डांगे यांनी केले.
सौजन्य :रोहिणी जोशी ,संपर्क मित्र