इंजिनिअर तरुणी निर्वस्त्र शिरली मंदिरात अन् देवीची मूर्ती घेऊन मारली तलावात उडी!VIDEO

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
हैदराबाद,
female-engineer-temple-lake-incident : येथील पीरजादीगुडा परिसरात एक धक्कादायक आणि अत्यंत गूढ घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित महिला सॉफ्टवेअर अभियंत्याने विवस्त्र अवस्थेत मंदिरात प्रवेश करून तेथील देवीची मूर्ती घेतली आणि तलावात उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या मृत्यूचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
 
female-engineer-temple-lake-incident
 
 
 
नेमकी घटना काय?
 
तेजस्विनी असे मृत महिला अभियंत्याचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिने अचानक आपले कपडे काढून विवस्त्र अवस्थेत जवळच्याच एका मंदिरात प्रवेश केला. तेथील 'अम्मावारू' देवीची मूर्ती उचलून ती थेट तलावाकडे गेली आणि मूर्तीसह पाण्यात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच आपत्ती प्रतिसाद दलाने बोटींच्या साहाय्याने शोधमोहीम राबवून तेजस्विनीचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, ती घेऊन गेलेली देवीची मूर्ती अजूनही सापडलेली नाही.
 
तपासात धक्कादायक खुलासे, १ लाखाचे भाडे?
 
पोलीसांनी केलेल्या सुरुवातीच्या तपासात काही थक्क करणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. तेजस्विनी ज्या फ्लॅटमध्ये राहत होती, त्याचे ती रोज ३ हजार ५०० रुपये म्हणजेच महिन्याला सुमारे १ लाख रुपये भाडे देत होती. विशेष म्हणजे, ती राहत असलेल्या इमारतीचे वरचे दोन मजले बेकायदेशीरपणे लॉजसारखे चालवले जात होते. या लॉज व्यवसायाचा आणि तेजस्विनीच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत.
 


सौजन्य: सोशल मीडिया
 
 
तसेच पोलिसांनी तेजस्विनीच्या आईची चौकशी केली असून तिचे आर्थिक व्यवहारही तपासले जात आहेत. प्राथमिक दर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असले, तरी तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करत आहेत.