सेलूत रा. स्व. संघाचे युवा संमेलन

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
सेलू,
rss राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त युवा संमेलनलाचे आयोजन शनिवार १८ रोजी स्थानिक शिवपार्वती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
 

rss youth conference organized in selu to inspire young generation 
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विवेक विचार मंचचे प्रांत संयोजक अतुल शेंडे होते. डॉ. तुषार वाघमारे, रा. स्व. संघाचे तालुका संघ चालक डॉ. ज्ञानेश्वर देवतारे, कार्यवाह कृष्णा जनार्धन कावळे, अमृतलाल व्यास व विनोद बेदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्याची प्रेरणा युवकांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनात ८० युवकांचा सहभाग होता. यावेळी अतुल शेंडे यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी चारित्र्यसंपन्न, संघटित आणि समाजहिताची जाणीव असलेले युवक घडणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शेंडे यांनी केले.
प्रास्ताविक भूषण कावळे यांनी केले. गोपीकिशन सोनटक्के यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी विराज पाठक, योगेश दुबे, भूषण कावळे, मिलिंद माहुरे, दर्शन ठाकरे, माधव कुलासपूरकर, गोपीकिशन सोनटक्के आणि संदीप झाडे यांनी परिश्रम घेतले.