बुलढाणा,
sonam-wangchuk : शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांना २१ दिवसांच्या उपोषणानंतर केंद्र सरकारने पोलीस बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन दडपले. हा लोकशाहीवर हल्ला असून वांगचूक यांच्या समर्थनार्थ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत अॅड. प्रविण सुरडकर यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह केला.
यावेळी माध्यमांशी बोलतांना अॅड. प्रविण सुरडकर यांनी केंद्र व राज्य सरकार हे पाषाणासारखे कठोर झाले असल्याचे सांगून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे. . ही बाब पुढच्या पिढीसाठी धोकादायक आहे. वांगचूक हे स्वतःच्या स्वार्थासाठी उपोषणाला बसले नाहीत. नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेकडो विद्यार्थी मानसिक दडपणाखाली वावरत आहेत. २० जुलैलासीजेपीचा मोर्चा संसद भवनावर धडकणार आहे. याची भीती वाटल्याने सरकारने वांगचूक यांचे उपोषण दडपले. नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्विकारून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणीही अॅड. प्रविण सुरडकर यांनी यावेळी केली.