पिकअपमधून साडेआठ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त

- सालेकसा पोलिसांची कारवाई

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
गोंदिया, 
stock-of-scented-tobacco-seized : सालेकसा तालुक्यातील रोंढा नाल्याजवळ एक पांढर्‍या रंगाच्या पिकअप वाहनातून 10 मोठे पोते सुगंधी तंबाखूचा साठा सालेकसा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या एकूण मालाची किमत 8 लाख 50 हजार रुपये आहे. ही कारवाई शुक्रवारी 17 जुलै रोजी करण्यात आली.
 
 
stock-of-scented-tobacco-seized
 
 
 
सालेकसा पोलिसांनी गस्तीदरम्यान तालुक्यातील रोंढा नाल्याजवळ एक पांढर्‍या रंगाच्या पिकअप क्रमांक एमएच 35 एजे 1042 ला थांबवून पाहणी केली असता वाहनात 5 लाख 50 हजार रुपये किमतीचे 10 मोठ्या पांढर्‍या रंगाचे पोत्यांमध्ये प्रत्येकी 50 नग आर. के. सुपर प्रिमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट, 10 मोठ्या पोत्यांमध्ये 2 हजार नग, आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट किमत दोन लाख रुपये व पाच मोठ्याफिकट पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये 50 नग एम. डी 7 सुपर प्रिमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट प्रत्येकी किमती 100 रुपये याप्रमाणे एकूण पाच मोठ्या पोत्यांमध्ये एक हजार नग आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट किमत एक लाख रुपये असा एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पिकअप वाहनचालक महेशसुशील नेवारे (41) रा. बहेला ता. लांजी जि. बालाघाट (म.प्र) व जगदीश लहुलाल भोयर (38) रा. अंधियाटोला ता. लांजी जि. बालाघाट यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवि नागोसे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार तूरकर, पोलिस नायक कान्सकर, पोलिस शिपाई वेदक व बैस यांनी केली.