आवाजाला ‘विश्रांती’ सुळे काही दिवस राजकीय संवादांपासून दूर

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मुंबई
supriya sule राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्षा आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे काही दिवस सार्वजनिक भाषणे आणि राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याची शक्यता आहे. घशात सौम्य सूज असल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील एक ते दोन आठवडे कमी बोलण्याचा आणि आवाजाला पूर्ण विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. याबाबतची माहिती सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावरून दिली आहे.
 
 
supriya sule
सुळे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, त्यांनी कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेऊन तपासणी करून घेतली. तपासणीनंतर त्यांच्या घशात सौम्य सूज असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आवाजावर ताण येईल असे कोणतेही काम टाळण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांच्या सूचनेनुसार, पुढील एक-दोन आठवडे त्या सार्वजनिक भाषणे, मुलाखती तसेच दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत. याच काळात आवाज पूर्ववत होण्यासाठी आवश्यक उपचारही त्या घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्या प्रकृतीबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी उपचारादरम्यान डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोर पालन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे काही दिवस त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि संवादांमध्ये मर्यादा येण्याची शक्यता आहे.