बुलढाणा,
theft-of-items-from-mahadev-temple : बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेने महादेवाच्या मंदीरात चोरी करणार्या चोरट्यांच्या मुसया आवळीत त्यांच्याकडून १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील मलकापूर रोड परिसरातील कन्हाळे ले आऊट येथील सिद्धेधर महादेव मंदिरातील चांदीचे दागिणे आणि पितळी साहित्य १६ जुलै रोजी अज्ञात चोरट्याने मंदीरात प्रवेश करीत मंदिरातील तांबे पितळेचे साहित्य आणि देवाचे चांदीचे दागिणे असा एकूण १८ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाणा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीवरून पोलिसांनी अॅशन मोडवर येत संशयीत सोळंकी आकाश बाहेती रा. पवार ले-आऊट, हॉस्पिटलच्या मागे, बुलढाणा येथून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून तांब्याच्या २ लहान व मोठ्या गंगाळ ६ हजार रुपये, पितळी समई २ हजार रुपये, पितळी नंदादीप ३०० रूपये, देवाचे चांदीचे एकूण ४ डोळे आणि नाक किंमत १० हजार रुपये असा माल जप्त केला आहे. कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील एपीआय सुनीलइंगळे, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, एस. के. चांद यांच्या पथकाने केली.