टमाटर भरलेला ट्रक पलटला

- सुकळी वळण रस्त्यावरील घटना ः वाहतूक विस्कळीत

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
गोंदिया,
truck-overturned : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव-नवेगाव बांध मार्गावरील सुकडी फाट्याजवळ रविवार, 19 जुलै रोजी सकाळच्या सुमारास टमाटर भरलेला ट्रक भररस्त्यात आडवा पलटल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
truck-overturned
 
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ व ट्रक चालकांच्या सहकार्याने ट्रकमधील टमाटर खाली करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने रस्त्यात आडवा पडलेला ट्रक हटविण्यात आला. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी सुमारे एक ते दीड तास लागला. दरम्यान, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनचालकाविरूद्ध् गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.