युक्रेनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

370 आत्मघाती ड्रोनद्वारे रशियाचे आकाश धुराने भरून टाकले...

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
व्यथित पुतिनकडून क्षेपणास्त्रांचा मारा
 
 
मॉस्को/कीव्ह,
ukraines biggest attack युक्रेनियन ड्रोन हल्ल्यानंतर अनेक तास मॉस्कोवर दाट काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. इलेक्ट्रोस्टालमधील वाइल्डबेरीज लॉजिस्टिक्स कॉम्प्लेक्स आणि नोगिन्स्कमधील एका तेल डेपोला आग लागली. ही ठिकाणे मॉस्कोच्या पूर्वेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहेत. स्थानिक गव्हर्नर आणि महापौरांनी या हल्ल्यांची पुष्टी केली. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने सर्वाधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनच्या पराष्ट्रमंत्र्यांनी ही घोषणा केली. युक्रेनियन हवाई दलाने कळवले की, रशियाने रात्रीतून 41 क्षेपणास्त्रे डागली आणि त्यापैकी 18 यशस्वीरित्या पाडली.
 
ukraines biggest attack
 
युक्रेनियन ड्रोनने इलेक्ट्रोस्टालमधील वाइल्डबेरीजच्या प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्राला, म्हणजेच एका मोठ्या गोदामाला लक्ष्य केले. नोगिन्स्कमधील एका तेल डेपोवरही हल्ला झाला. 24 साठवण टाक्या असलेला नोगिन्स्क डेपो मॉस्को प्रदेशासाठी एक महत्त्वाचे इंधन केंद्र आहे. आग इतकी तीव्र होती की अनेक तास आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले होते.
 
मॉस्कोच्या महापौरांनी सांगितले की, त्या भागाच्या दिशेने 370 हून अधिक ड्रोन सोडण्यात आले होते. रशियन संरक्षण यंत्रणांनी अनेक ड्रोन रोखले, परंतु काही त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचले आणि त्यामुळे आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. प्रादेशिक गव्हर्नर यांनी सांगितले की, इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, परंतु कोणताही तात्काळ धोका नाही.