मानोरा,
manora गेल्या आठ दिवसापासून ग्रामीण भागात दररोज रात्री ७ ते ११ सक्तीचे भारनियमन चालू केल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी थेट वीज वितरण कार्यालय गाठून झोपा आंदोलन कारखेडचे ग्रामपंचायत सदस्य बबन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै रोजी केले.
तालुयातील गव्हा सब स्टेशन अंतर्गत येणार्या प्रत्येक गावात रात्रीचे भारनियमन चालु आहे, दररोज रात्रीचे भारनियमन चालु असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. शिवाय अपुर्या पावसामुळे वातावरणात कमालीची उष्णता असल्याने नागरिक प्रचंड उघड्याने त्रस्त आहेत. त्यात वीज वितरणच्या वतीने सक्तीचे भारनियमन लादल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झालेल्याने या संदर्भात दोन दिवसाआधी उपकार्यकारी अभियंता रवींद्र गिरी यांना नागरिकांनी होत असलेली अवहेलना थांबवा अशा प्रकारे निवेदन देण्यात आले होते. परंतु, भारनियमन चालुच ठेवल्याने परीसरातील कारखेडा, वरोली, सेवादास नगर, तळप बु, विठोली येथील नागरीकांनी वीज वितरण कार्यालय मानोरा येथे जाऊन झोपा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी कारखेडचे ग्रामपंचायत सदस्य बबन देशमुख, उपसरपंच अनिल काजळे, सेवादास नगर चे सरपंच नेमीचंद राठोड, संतोष इंगोले, आशिष पाटील, वरोलीचे सरपंच आवारे सह किमान पाचशे नागरीक उपस्थित होते. यावेळी मानोर्याच्या ठाणेदार नैना पोहेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शेती आणि गावठाण फिडर एकत्र असल्याने गावांना भारनियमन चा फटका बसत आहे. अति तातडीने गावठाण फिडर वेगळे् करण्यात येईल, असे आश्वासन सहायक अभियंता प्रशिक खाडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. भारनियमन ने त्रस्त झालेले नागरिक स्वयंस्फुर्तीने घरून ब्लॅकेट घेऊन मिळेल त्या वाहनाने आंदोलनस्थळी पोहचले. आंदोलनात उद्रेक होऊन नये म्हणून कारखेडचे पोलिस पाटील वासुदेव सोनोने, चिखली चे पोलिस पाटील शामराव राठोड, देऊरवाडीचे पोलिस पाटील विवेक आडे हे घटनास्थळी उपस्थित होते.