वर्धा,
vishwa hindu parishad बजरंग दल सेवा सप्ताहानिमित्त विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वर्धा जिल्हा तसेच विश्व हिंदू परिषद सेवा विभागाच्या वतीने दत्त मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दत्त मंदिराची साफसफाई करून स्वच्छता, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देऊन मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
या उपक्रमात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती व स्थानिक कार्यकत्र्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी विहिंप विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष सुभाष राठी, विहिंप जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार, विहिंप जिल्हा सहमंत्री व श्रीदत्त देवस्थानचे अध्यक्ष अरविंद कोकाटे, सहमंत्री संजय पोफळी, विहिंप जिल्हा विशेष संपर्क प्रमुख गजानन मसाये, विहिंप जिल्हा कोषाध्यक्ष व दत्त देवस्थान सदस्य अतुल देशपांडे, विहिंप जिल्हा कार्यालयीन प्रमुख मारोती सातपुते, बजरंग दल जिल्हा संयोजक महेश राऊत, अमोल अतकर, शहर विहिंप मंत्री सुधीर मानकर, विठ्ठल व्यवहारे, किरण उपाध्ये, अमन मिश्रा, गोविंद पांडे, यश श्रीवास्तव, वर्धन बघेल, नीरज भोयर, नीरज पाल, विजय चिलानी, रोहित पांडे, रवींद्र चाफेकर यांनी या स्वच्छता अभियानास सहकार्य केले.