वन्य प्राण्यांमुळे महामार्गावर अपघाताचा धोका

वाहनांचा वेग मर्यादित ठेवा

    दिनांक :19-Jul-2026
Total Views |
मानोरा,
highway तालुयातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए वरील पंचाळा फाटा ते तीर्थक्षेत्र अमरगड (वाई गौळ) तसेच मानोरा-कारंजा महामार्गावरील काही किलोमीटरचा परिसर वनव्याप्त आहे. या भागात दिवसा अथवा रात्री वन्य प्राणी अचानक रस्ता ओलांडत असल्याने अपघातांची दाट शयता निर्माण झाली आहे.
 

wild animals on highway raise accident risk in manora forest stretch 
सध्या पावसाळा सुरू असल्याने महामार्ग व ग्रामीण रस्त्यांच्या दुतर्फा झाडवण दाट झाली आहे. त्यामुळे रस्ता ओलांडण्याच्या प्रतीक्षेत असलेले वन्य प्राणी दिसून येत नाहीत व ते अचानक वाहनांसमोर येतात. यातून लहान-मोठे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर मानोरा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद सानप यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वनव्याप्त भागातून मार्गक्रमण करताना वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा. विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक सतर्कता बाळगावी. वन्यजीवांचे संरक्षण व स्वतःची सुरक्षितता यासाठी सहकार्य करावे.
वन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांना तातडीने वनवे, वनव्याप्त प्रदेशात महामार्गाच्या दोन्ही बाजूला फलक लावण्याबाबतची कारवाई करण्यास भाग पाडण्याची मागणी या निमित्याने विधिज्ञ श्रीकृष्ण कल्याण राठोड यांनी केली आहे.