नवी दिल्ली,
ind-vs-eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल, तर दुपारी ३:०० वाजता भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे जो संघ आजचा सामना जिंकेल तो मालिका जिंकेल. आजचा सामना जिंकून इतिहास रचण्याची भारतीय संघाला एक मोठी संधी आहे, कारण भारतीय संघाने गेल्या २२ वर्षांत लॉर्ड्सच्या या मैदानावर एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही.