वर्धा,
special-buses-for-pandhari : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणार्यांसाठी परिवहन महामंडळाचा वर्धा विभाग सज्ज झाला आहे. यंदा विभागातील १२० बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी १०० पेक्षा जास्त बस पंढरपूरला पाठविण्यात आल्या होत्या.
आगारनिहाय पंढरपूरसाठी प्रौढ प्रवासी तिकीट दर असून, महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत योजना आहे. पंढरपूरला जाणार्या प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षणासाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या मागणीसाुनर आवश्यकतेप्रमाणे बस उपलबध करण्यात येणार आहेत. बसच्या बुकिंगसाठी प्रवाशांना संबंधित आगारप्रमुख किंवा स्थानक प्रमुखांशी संपर्क साधावा लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. २५ जुलै आषाढी एकादशी असून २० जुलै ते ३० जुलै असा दहा दिवस यात्रा कालावधी आहे.
४५ वारकरी एकत्र आल्यास गावातूनच एसटी
कोणत्याही गावातून किमान ४५ किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्यांना थेट त्यांच्या गावातूनच पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यात ज्येष्ठ आणि महिलांच्या सवलतीही कायम राहतील.