नागपूर,
Ankur Pre School महिला कला निकेतन संचालित अंकुर प्रीस्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ पारंपरिक व उत्साहपूर्ण वातावरणात झाला. नवागत विद्यार्थी व पालकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश व माता सरस्वती यांच्या प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांना स्वागतपर भेटवस्तू देण्यात आल्या. पालकांच्या सहभागातून लहानग्यांनी कुंकवाने 'श्री' लिहून शिक्षणाच्या शुभारंभाचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. Ankur Pre Schoolयावेळी शाळेची शैक्षणिक संकल्पना, अभ्यासक्रम व विविध उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. शिक्षकांनी कृतीगीत, संवादात्मक खेळ आणि मनोरंजक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला महिला कला निकेतनच्या व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सौजन्य:सुफला ताटके ,संपर्क मित्र