टायर फुटल्याने ऑटो उलटला

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
सेलू,
accident : सेलू-हिंगणी मार्गावरील घोराड परिसरात ऑटोचा टायर फुटल्याने आज २ रोजी अपघात झाला. यात हिंगणी येथील सुरेखा अवचट (४४) या गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.-३१-सी.व्ही. ७३६९ क्रमांकाचा ऑटो सेलूकडून हिंगणीकडे जात होता. दरम्यान, घोराड येथील सेवालाल महाराज मंदिरासमोर ऑटोचा पुढचा टायर फुटल्याने ऑटो रस्त्यावरच उलटला. यात सुरेखा अवचट या ऑटोखाली दबल्या. नागरिकांनी ऑटो उचलून त्याखाली दबलेल्या अवचट यांना बाहेर काढले.
 
 

APGHAT