तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
balasaheb mangulkar यवतमाळ जिल्ह्यातील शेतकèयांना तत्काळ पीकविमा मंजूर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसचे यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विधानभवनाच्या पायèयांवर आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून हक्काच्या पीकविम्यापासून वंचित असून, शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मांगुळकर यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.जोपर्यंत शेतकèयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
आंदोलनाची हीच तीव्रता लक्षात घेऊन कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी तत्काळ या प्रकरणात मध्यस्थी केली. त्यांनी थेट व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आंदोलनकर्ते आ. मांगुळकर यांच्याशी संवाद साधला.
यवतमाळमधील पीकविम्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, यावर लवकरच एक विशेष बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले. यासोबतच कृषिमंत्र्यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्याशीही फोनवरून सविस्तर चर्चा केली आणि पीकविम्याबाबत शासन स्तरावर तातडीने पावले उचलली जातील असा शब्द दिला. कृषिमंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी विधानभवनाच्या पायèयांवरील आपले आंदोलन अखेर मागे घेतले. मात्र, शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर बैठक घेऊन शेतकèयांना पीकविमा मंजूर केला नाही, तर आगामी काळात पुन्हा तीव्र संघर्ष छेडण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे.