सेलू,
electric wires सेलू शहरातील प्रभाग १ मधील जैस्वाल ले-आऊट परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजंच्या तारा लोंबकळत असल्याने अपघाताचा मोठा धोका तयार झाला आहे. या समस्येबाबत महावितरण विभागाला वारंवार सूचना व तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.लोंबकळणार्या तारा रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार यांच्यासाठी मोठा धोका ठरत आहेत. पावसाळ्यात या तारा अधिकच जीवघेण्या झाल्या असून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महावितरण विभागाकडे अनेक वेळा तक्रार करूनही अधिकारी केवळ आश्वासनं देत आहेत. प्रत्यक्षात दुरुस्तीचे कोणतेही काम हाती घेतले जात नसल्याने वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.आम्ही अनेक वेळा महावितरणकडे तक्रार केली. मात्र, अजूनही समस्या कायम आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? धोकादायक वीजतारा दुरुस्त कराव्यात, अशी मागणी जैस्वाल ले-आऊटमधील अमोल बुधबावरे यांनी केली आहे.