इतका घमंडीपणा का? नेटकरी भडकले

5 वर्षांच्या मुलाने डिलिव्हरी बॉयला सुनावले

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
मुंबई
dia mirza बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. यामागे तिचा कोणताही चित्रपट किंवा वादग्रस्त वक्तव्य नसून, तिचा पाच वर्षांचा मुलगा अव्यान आझाद रेखी याच्याशी संबंधित तिने सांगितलेला एक किस्सा कारणीभूत ठरला आहे. नुकत्याच अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या दियाने हवामान बदल आणि प्लास्टिकच्या वापराबाबत चर्चा करताना हा अनुभव सांगितला होता.
 

dia mirza trolled over son delivery boy plastic comment sparks debate 
मुलाखतीदरम्यान हवामान बदल आणि प्लास्टिकच्या वापराबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर दियाने सांगितले की, एकदा तिच्या घरी नारळाचे पाणी घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयच्या हातात प्लास्टिकची पिशवी आणि प्लास्टिकचा स्ट्रॉ होता. हे पाहताच तिच्या पाच वर्षांच्या मुलाने त्याला प्लास्टिकच्या वापराबाबत थेट सुनावले. आपल्या घरात प्लास्टिकच्या वापराला विरोध असल्याचे सांगत दियाने पुढे म्हटले, “नारळ पाणीवाल्याने आम्हाला प्लास्टिकच्या पिशवीत नारळाचं पाणी दिलं आणि त्यासोबत स्ट्रॉसुद्धा प्लास्टिकचा दिला होता. प्लास्टिकच्या वापराने माझा खूप संताप होतो. आपण कोणाच्या घरी डिलिव्हरी देतोय, हे त्या डिलिव्हरी बॉयला कसं माहित असणार? तर माझा मुलगा अव्यानने दरवाजा उघडला आणि तो त्याच्या कमरेवर हात ठेवून म्हणाला, ‘भैय्या, प्लास्टिक घेऊन आले आहेत. आमच्या घरात प्लास्टिकच्या वापराला मनाई आहे. तुम्ही प्लास्टिकमधून ते पाणी काढा आणि त्या स्ट्रॉसह ती पिशवी घेऊन जा.’”
दियाने सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर सोहा अली खानने अव्यानचे कौतुक केले. इतक्या लहान वयात एखाद्या मोठ्या व्यक्तीसमोर आत्मविश्वासाने स्वतःचे मत मांडणे सोपे नसते, असे मत सोहाने व्यक्त केले.
मात्र, सोशल मीडियावरील अनेक नेटकऱ्यांनी दियाच्या या अनुभवावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पर्यावरणाबाबत जागरूकता असणे महत्त्वाचे असले तरी डिलिव्हरी बॉयशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटले. काहींनी मुलाला शिष्टाचार शिकवण्याची गरज असल्याचेही नमूद केले.
एका युजरने प्रतिक्रिया देतानाdia mirza  लिहिले, “जर तुला प्लास्टिक नको असेल तर स्वतः बाहेर जाऊन गाडीवरून नारळपाणी खरेदी केलं पाहिजे. पेपर बॅगमध्ये नारळपाणी घरी आणलं पाहिजे. हीच लोकं नंतर कॅमेरासमोर फार सभ्य आणि खरं असण्याचा दिखावा करतात.” तर दुसऱ्या एका युजरने, “कोणत्या गोष्टीचा इतका घमंड आहे?” असा सवाल उपस्थित केला. आणखी एका प्रतिक्रियेत, “४० डिग्रीच्या गरमीत एखादी व्यक्ती तुमची सेवा करत असेल तर त्याच्याशी अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
एका नेटकऱ्याने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिले, “उन्हातान्हातून घरोघरी जाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब डिलिव्हरी बॉयवर एक लहान मूल रागावतं आणि मोठी माणसं याला शौर्य म्हणतात. दुसरीकडे त्या मुलाची आई कॅमेरासमोर विविध मेकअप प्रॉडक्ट लावलेली दिसते, जे प्लास्टिकच्याच पॅकेजिंगमध्ये विकली जातात.”या सर्व प्रतिक्रिया आणि टीकेनंतरही दिया मिर्झाने अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.