डॉ. सोनाली वैरागडे यांना 'समर्पित डॉक्टर' पुरस्कार

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
Dr. Sonali Vairagade राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या पूर्वसंध्येला असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल्स व माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार सोहळ्यात डॉ. सोनाली वैरागडे यांना 'समर्पित डॉक्टर' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

567 
 
कांचन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन डॉ. वैरागडे यांच्या रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा, करुणामय सेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. Dr. Sonali Vairagade  यावेळी दत्ता मेघे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. धीरज झाडे उपस्थित होते.या सन्मानाबद्दल डॉ. सोनाली वैरागडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या समाजाभिमुख रुग्णसेवेचा प्रवास अधिक प्रेरणादायी ठरो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सौजन्य:निकिता लुटे,संपर्क मित्र