संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
जळगाव
sant sakharam maharaj wadi sansthan अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थांनला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. मोठमोठे लोट बाहेर पडताना स्पष्ट दिसत होते, तसेच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही आग नेमकी कशी लागली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
 
 
fire breaks out at sant sakharam maharaj wadi sansthan in amalner jalgaon
घटनेची माहिती मिळताच आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संस्थानामध्ये कोणी अडकले होते की नाही, याबाबतही अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही, अशी स्थिती सुरुवातीला होती.
आग तीव्र स्वरूपाची sant sakharam maharaj wadi sansthan  असल्याने नियंत्रण मिळवण्यासाठी पत्रकार संघाच्या वतीने खाजगी टँकरही घटनास्थळी आणण्यात आला. विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.अमळनेरच्या वाडी संस्थानाला लागलेली ही भीषण आग तब्बल तासाभरानंतर आटोक्यात आली. अमळनेर, शिरपूर, पारोळा, धरणगाव, चोपडा यांसह इतर तालुक्यांमधील अग्निशमन बंबांच्या मदतीने आग नियंत्रित करण्यात आली.